लखनौ- मोटार वाहन कायद्यातील बदलानुसार, हेल्मेट न घालण्यासाठी हजारो रुपये दंड आकारला जातो आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. मात्र, तुम्ही जर कार चालवत असाल, तर तुम्हालाही सावध राहण्याची गरज आहे. कारण हेल्मेटसक्तीमधून तुमचीही सुटका नाही.
होय! बरेलीतील एका व्यक्तीला हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती कार चालवत होता. तरीही त्याला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अनीश नरूला असे या व्यक्तीचे नाव आहे. आता हा व्यक्ती न्याय मागण्यासाठी अधिकाऱ्यांकडे खेटे घालत आहे.