नवी दिल्ली - यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले असून, सहा जण जखमी झाले आहेत. पावसामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने द्रुतगती महामार्गावरून ३० फूट खाली कोसळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात भरती केले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.
यमुना द्रुतगती महामार्गावर कारचा भीषण अपघात; ३ जागीच ठार - car accident noida
पावसामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने द्रुतगती महामार्गावरून ३० फूट खाली कोसळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात भरती केले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
यमुना द्रुतगती महामार्गावर कारचा भीषण अपघात
नोएडाच्या एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाने नवी एंडेव्हर कार खरेदी केली होती. संबंधित तरुण मित्रांसोबत फिरायला निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्रेटर नोएडाच्या सीओतनू उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळच्या सुमारास घडली असून जखमींवर ब्रॉड डेड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना माहिती दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.