अहमदाबाद -गुजरातमधील नर्मदा येथे महाराष्ट्रातील एका कुटुंबाच्या कारला अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीने सात ते आठ वेळा पलटी घेतली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नाही.
गुजरातमधील नर्मदा येथे कारला भीषण अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद - अशोक कुमार वाडीलाल अपघात
कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार हवेत उडाली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीने सात ते आठ वेळा पलटी घेतली होती. अपघाताचे दृश्य जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
गुजरातमधील नर्मदा येथे कारला भीषण अपघात
हेही वाचा -दोन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ट्रक ड्रायव्हर जागीच ठार; एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती
पनवेल येथील अशोक कुमार वाडीलाल हे आपल्या कुटुंबासह 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी जात होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार हवेत उडाली. अपघाताचे दृश्य जवळच असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
TAGGED:
road accident in narmada