नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा मंजूर केला आहे. सिद्धू यांच्या राजीनामा मंजुरीसाठी आणि अन्य कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.
नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून मंजूर - उत्तरप्रदेश
खरे तर मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर मी सिद्धू यांच्याकडे चांगले आणि महत्त्वाचे खाते सोपवले होते. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे, असे अमरिंदर सिंग म्हणाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासोबत कोणत्याही समस्या नसल्याचे सांगितले. 'खरे तर मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर मी सिद्धू यांच्याकडे चांगले आणि महत्त्वाचे खाते सोपवले होते. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. माझ्या कार्यालयात राजीनाम्याचे पत्र पोहोचवल्याचे मला सांगण्यात आले आहे. मी ते पाहून नंतर काय करता येईल, याचा विचार करेन,' असे ते म्हणाले होते. परंतु, त्यांनी आज सिद्धूंचा राजीनामा मंजूर करुन राज्यपालांकडे पुढील प्रकियेसाठी पाठवून दिला आहे.
सिद्धू यांनी स्वतःच्या ट्विटरवरुन १० जूनला राजीनाम्याचे पत्र शेअर केले होते. सिद्धू यांचे खाते नुकतेच बदलण्यात आले होते. त्यांच्याकडे ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार एका महिन्यापूर्वीच सोपवण्यात आला होता. मात्र, सिद्धू खाते बदलल्यामुळ नाराज होते. सिद्धूंनी अद्याप पदभार स्वीकारला नव्हता. त्यांनी काही दिवसांपूर्वी तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तरप्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. मात्र, याचा फारसा उपयोग झाला नाही.