महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लाॅकडाऊन: दिल्लीच्या कनॉट प्लेस मार्केटमध्ये शुकशुकाट... बनला कुत्र्यांचा अड्डा - लाॅकडाऊन बातमी

भारतात कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. त्यानुसार नागरिकांनी घरात बसणे पसंत केले आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेस मार्केटमध्ये शुकशुकाट आहे.

cannaught-place-market-a-new-spot-for-street-dogs
cannaught-place-market-a-new-spot-for-street-dogs

By

Published : Apr 7, 2020, 11:41 AM IST

नवी दिल्ली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. त्यानुसार नागरिकांनी घरात बसणे पसंत केले आहे. दरम्यान दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेस मार्केटमध्येही शुकशुकाट आहे. ऐरवी याठिकाणी प्रचंड गर्दी असते. मात्र, आता याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून एकप्रकारे कुत्र्यांचा अड्डा बनला आहे.

दिल्लीच्या कनॉट प्लेस मार्केटमध्ये शुकशुकाट...

हेही वाचा-लॉकडाऊन : 80 वर्षाच्या आजीची तब्बल 3 दिवस पायपीट, चालल्या 'इतके' अंतर

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 14 वा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details