नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आज पूर्णविराम लागला. तिसऱ्या टप्प्यामध्ये १३ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघामध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण १ हजार ६१२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपसोबत स्थानिक पक्षांचे दिग्गज नेते रिंगणात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या उमेदवारांवर लागले आहे.
महाराष्ट्र -
महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. त्यांच्या टक्करमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही स्थानिक पक्षांनीही आघाडी केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनी काही पक्ष संघटना मिळून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यात २४९ उमेदवार रिंगणात आहेत.
यामध्ये ज्या उमेदवारांवर देशाची नजर लागून आहे त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र अहमदनगर येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टीही मैदानात आहेत.
छत्तीसगड -
छत्तीसगड येथे भ्रष्टाचार, गरिबी आणि शेतकऱ्यांचा मुद्दा आघाडीवर आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर तीक्ष्ण प्रहार केले आहेत. येथे एकूण १२३ उमेदवार उभे आहेत. येथे ७ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये रायपूर, दूर्ग, बिलासपूर, कोरबा, सरगुजा, रायगड आणि जांगिर चंपा या मतदारसंघांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, उत्तर कन्नड येथून केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेडगे, तसेच बिलासपूर येथून केंद्रीय मंत्री रमेश जिगजिगानी रिंगणात आहेत. तसेच भाजप नेते येदियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय. राघवेंद्र मैदानात आहेत.
ओडिशा -
ओडिशा येथे ६ लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये ६१ उमेदवार उभे आहेत. येथे काँग्रेससह स्थानिक पक्ष बीजू जनता दलाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. तर, भाजपचे दिग्गज नेते येथून निवडणूक लढवत आहेत. यामध्ये भाजप प्रवक्ते संबित पात्रा पुरी येथून निवडणूक लढत आहेत. तसेच बीजू जनता दलाचे वरिष्ठ नेते के. बी. महताब, पिनाकी मिश्रा आणि अरुप पटनायकही मैदानात आहेत.
बिहार -
बिहार येथे ५ लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये एकूण ८२ उमेदवार मैदानात आहेत. या मतदारसंघांमध्ये जहांगीरपूर, सुपौल, अरारीया, मधेपूरा आणि खगरीया या मतदारसंघांचा समावेश आहे. येथे मध्येपूरा येथून एलजेडी पक्षाचे शरद यादव आरजेडीच्या तिकिटावरुन निवडणूक लढत आहेत.