महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताला 'एपीआय'वरील अवलंबित्व कमी करता येईल का? - India Active pharmaceutical ingredient

सध्याची मागणी पुरवण्यासाठी औषध कंपन्यांना मुख्य साहित्याचा तुटवडा सहन करावा लागत आहे. जोपर्यंत साहित्याचा पुरवठा होत नाही तोपर्यंत उत्पादन अशक्य आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः स्थानिक औषध कंपन्यांना एचसीक्यूचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिअंटची(एपीआय) कमतरता भासत आहे.

active pharmaceutical ingredients
active pharmaceutical ingredients

By

Published : Apr 22, 2020, 7:09 PM IST

नव्या कोरोना विषाणूवर अद्याप कोणताही उपचार नाही. औषध उद्योगालादेखील कोणत्या औषधाचा शोध लागलेला नाही. लसी विकसित करण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर, इतर रोगांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे कोविड-19 रुग्णांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, अशा औषधांची मागणी वाढीस लागली आहे. यामध्ये एचआयव्ही, मलेरिया या आजारांवर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या काही आणि अँटीबायोटिक औषधांचा समावेश आहे. भारतातील औषध उद्योगाचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

खरंतर, मागील दोन ते तीन दशकांमध्ये भारतीय औषध उद्योगाचा विस्तार झाला आहे. अफ्रिकेसारख्या विकसनशील देशांपासून अमेरिकेसारख्या विकसित देशांपर्यंत, अनेक देश भारताकडून औषधांची आयात करीत आहेत. याशिवाय, भारत मलेरियावरील औषधाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. अमेरिका, ब्राझील आणि इस्राईलसारख्या अनेक देशांनी भारताला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. याचवेळी, आपल्याला देशांतर्गत गरजांची पुर्तता करणेदेखील गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, भारतीय औषध कंपन्यांनी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ केली आहे. मात्र, याठिकाणी एक समस्या आहे.

सध्याची मागणी पुरवण्यासाठी औषध कंपन्यांना मुख्य साहित्याचा तुटवडा सहन करावा लागत आहे. जोपर्यंत साहित्याचा पुरवठा होत नाही तोपर्यंत उत्पादन अशक्य आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः स्थानिक औषध कंपन्यांना एचसीक्यूचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिअंटची (एपीआय) कमतरता भासत आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील औषध कंपन्या प्रामुख्याने एचआयव्हीविरोधी औषधे, अझिथ्रोमायसिन आणि क्लोरोक्वीनचे उत्पादन करतात. सध्या क्लोरोक्वीनला भरपूर मागणी आहे. स्थानिक औषध कंपन्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन फॉस्फेट टॅब्लेट्सची निर्मिती करीत आहेत. कारण या औषधास स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र, उत्पादनाची गरज पुर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात एपीआय उपलब्ध नाहीत.

कोविड-19 ची परिस्थिती उद्भवण्यापुर्वी, बाजारपेठेत एचसीक्यू टॅब्लेट्सना कसलीही बाजारपेठ नव्हती. मलेरिया, संधिवात आणि त्वचाक्षयासारख्या आजारांसाठी त्याचे उत्पादन केले जात. एचसीक्यूचा वापर आणि निर्यातदेखील कमी होती. परिणामी, एचसीक्यू उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या एपीआयच्या तुटवड्याकडे कंपन्यांनी लक्ष दिले नाही. कोविड-19 उद्भवल्यानंतर एचसीक्यूची मागणी वाढली. औषध कंपन्यांनी कमीत कमी प्रमाणात एपीआयचा वापर करुन औषधाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. मात्र, एपीआयची नव्याने आयात केल्याशिवाय यापुढे उत्पादन सुरु ठेवणे शक्य नाही.

इप्का लॅबोरेटरीज्, झायडस, सिप्लासारखे आघाडीचे औषध उद्योग आणि हैदराबाद-स्थित कंपन्या हिटरो ड्रग्स, नॅटको फार्मा आणि लॉरस लॅब्ससारख्या कंपन्या क्लोरोक्वीनचे उत्पादन करतात. जरी त्यांनी एचसीक्यूचे उत्पादन वाढविले आहे, तरीही एपीआयची कमतरता आहे. यापैकी काही कंपन्यांनी चीनहून कच्चा माल मागवला आहे आणि कंटेनरच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, एचसीक्यूच्या निर्मितीसाठी काही स्थानिक बल्क आणि एपीआय कंपन्या आता कच्च्या माल आणि माध्यमिक द्रव्यांच्या (इंटरमिडीएट्स) उत्पादनात सहभागी झाल्या आहेत.

तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनानेही हे आव्हान ओळखले आहे. काही बल्क ड्रग कंपन्यांना माध्यमिक द्रव्यांची निर्मिती करण्याची विनंती केली आहे. क्लोरोक्वीनची मागणी डळमळीत झाल्यानंतर यापैकी बहुतांश कंपन्या बंद झाल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. एका स्थानिक कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की ते चीनहून येणाऱ्या एपीआय मालाची वाट पाहत आहेत. कोविड-19 वर उपचार करण्यासाठी एचसीक्यूव्यतिरिक्त, अझिथ्रोमायसिन, क्लोरोक्वीन फॉस्फेट, पॅरासिटामॉल, माँटेलुकास्ट, ऑसेलटामिव्हिर, फॅविपिरावीर, लोपीनवीर, रेमडेसिवीर आणि इव्हर्मेक्टिन यासारख्या ब्रॉड-स्पेक्ट्रम प्रतिजैविके आणि संसर्ग रोखणाऱ्या (अँटीव्हायरल) औषधांचा वापर वाढविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details