बंगळूर- कर्नाटकात १५ जागांसाठी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्या. गुरूवारी होणाऱ्या मतदानासाठी सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस व जनता दलाच्या १५ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ राज्यात आली होती.
निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले कि,सर्वच १५ विधानसभा मतदारसंघात मंगळवारी या १३ दिवसांच्या प्रचाराची सांगता झाली. गुरूवारी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. या मतदानाची मतमोजणी ९ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. काही छोट्या-मोठ्या घटना वगळता कायदा व सुव्यवस्थेचे कोणतेही प्रश्न उपस्थित झाले नाहीत. कारण आमच्या अधिकाऱ्यांनी या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली होती.