नवी दिल्ली - राजधानीतील नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजेच कॅगच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. उपराष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवरु या कार्यक्रमाची माहिती दिली.
कॅग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था - उपराष्ट्रपती - नियंत्रक आणि महालेखापाल कार्यालय
कॅग डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था म्हणून पुढे आली आहे. कॅग फक्त सार्वजनिक आर्थिक उत्तरदायित्वच पाहणारी नाही संस्था नाहीत तर कार्यकारी व्यवस्थेची मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शन करणारी संस्था आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
![कॅग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था - उपराष्ट्रपती पुतळ्याचे अनावरण करताना उपराष्ट्रपती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:13:57:1595411037-8125430-348-8125430-1595407997974.jpg)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अलौकिक बुद्धिमत्ता असलेले आधुनिक भारताचे निर्माते आहेत. देशाला कठीण परिस्थिती मार्ग दाखविल्याबद्दल आणि राज्यघटनेचा मसुदा करण्यातील त्यांच्या योगदानाबद्दल आपण कायम त्यांचे आभारी आहोत, असे व्यंकय्या नायडू म्हणाले.
'कॅगबद्दल बाबासाहेबांनी एक प्रसिद्ध वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, माझ्या मते या संस्थेचा अधिकारी भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे. या संस्थेला त्यांचा कारभार करण्यासाठी न्याय व्यवस्थेसारखेच स्वातंत्र्य गरजेचे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. कॅग डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नांना बळ देणारी संस्था म्हणून पुढे आली आहे. कॅग फक्त सार्वजनिक आर्थिक उत्तरदायित्व पाहणारी नाही संस्था नाही तर कार्यकारी व्यवस्थेची मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक संस्था आहे, असेही ते म्हणाले.