नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्देश साध्य करण्यासाठी स्टार (STARS ) कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. STARS म्हणजे Strengthening teaching learning and result for states असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
STARS हा कार्यक्रम जागतिक बँकेच्या पाठिंब्याने राबवला जात असून शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार आहे. या संपूर्ण प्रोजेक्टची किंमत 5,718 कोटी रुपये आहे. यामध्ये जागतिक बँकेची 500 मिलियन डॉलर्सची मदत होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.