11.40 PM : जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा सुरु. शर्ट काढून करत आहेत निदर्शने..
11.10 PM : जामिया विद्यापीठ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी..
9.00 AM :जामिया विद्यापीठही राहणार पाच जानेवारीपर्यंत बंद; वसतीगृहातील विद्यार्थी पडले बाहेर..
16 डिसेंबर -05.05 AM अटक केलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी सुटका केली.
10.20 PM : दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १५ मेट्रो स्टेशन बंद.
9.09 PM :दिल्लीच्या ओखला, जामिया, न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खदर भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील - मनीष सिसोदिया (उपमुख्यमंत्री, दिल्ली)
8.50 PM :दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला नाही - चिन्मय बिसवाल (पोलीस उपायुक्त, साऊथ-ईस्ट दिल्ली)
8. 29 PM :जेएनयू विद्यार्थी संघटनेतर्फे दिल्लीतील सर्व लोकांना आणि विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन. रात्री नऊ वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाजवळ येण्याची केली मागणी. तसेच जेएनयूच्या विद्यार्थ्यांना साबरमती ढाब्याजवळ एकत्र येण्यास सांगितले.
8.24 PM :'जेएनयू' आणि जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी दिल्ली पोलीस मुख्यालयावर मोर्चा नेणार - सूत्र.
6.42 PM : जामिया विद्यापीठाच्या बाहेर आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या.
6.41 PM : मी इथे घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी आले होते. पोलिसांनी माझा मोबाईल काढून घेतला, एका पुरुष पोलिसाने माझे केस ओढले, तसेच मला बॅटनने मारहाण करण्यात आली. माझा फोन परत मागितला असता, मला शिवीगाळ करण्यात आली.. - बुश्रा शेख, पत्रकार (बीबीसी)
6.40 PM : लेफ्टनंट गव्हर्नरांशी बोलून, परिस्थिती निवळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आवाहन केले. आंदोलकाला हिंसक वळण देणाऱ्या खऱ्या अपराध्यांना पकडून शिक्षा करण्यात आली पाहिजे - अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
6.35 PM : पोलिसांनी परवानगीशिवाय जामिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मारहाण केली - वासीम अहमद खान (विद्यापीठ प्रवक्ता)
6.30 PM : पोलीस-विद्यार्थी झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी..
नवी दिल्ली- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापिठाचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी दिल्लीमधील मथुरा रोडवरील तीन बस पेटवल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या उपस्थित झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, पोलीसही गुन्हेगारांना अटक करत आहेत.
जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मुलाखत..
आंदोलनाच्या प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया..
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. दिल्लीमधील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यीदेखील याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला शनिवारपासूनच भीषण स्वरूप प्राप्त झाले. पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या झटापटीमध्ये दोन्ही बाजूचे अनेक लोक आतापर्यंत जखमी झाले आहेत.
हेही वाचा : #CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा बंद