महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jamia CAA, NRC protest: 'सरकारने आमच्या डीएनएवरून ओळख पटवावी'

देशात जी परिस्थिती आहे त्यातून देशाला वाचवणे आत्ताच्या घडीला सर्वात महत्त्वाचे आहे. देशातील मुस्लीम घाबरलेले आहेत. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत - बी. जी. कोळसे पाटील

Jamia CAA
जामिया आंदोलन

By

Published : Jan 15, 2020, 3:50 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात जामिया मिलीया विद्यापीठात मागील एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. आज त्यांनी सीएए, एनआरसीविरोधात जामियामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

बी. जी कोळसे पाटील जामियामधील आंदोलनात सहभागी
देशात जी परिस्थीती आहे त्यातून देशाला वाचवणे आत्ताच्या घडीला सर्वात महत्त्वाचे आहे. देशातील मुस्लीम घाबरलेले आहेत. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आमचे रक्तही सारखे आहे. जर सरकारला एनआरसी लागू करायचे असेल, तर त्यांना डीएनएवरून लोकांची ओळख पटवावी लागेल. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही हिंदूच्या नाही, तर सरकारच्या योजनांच्या विरोधात आहोत. आरएसएस आणि भाजप देशाचे दुश्मन आहेत, असे म्हणत त्यांनी सीएए आणि एनआरसीला जोरदार विरोध केला. जामिया विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गांधी ग्लोबल फॅमिली संस्थेचे जनरल सेक्रेटरी राम मोहन राय हे देखील उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अर्थ समानता असा होतो. मात्र, सरकार ध्रुविकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details