महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 22, 2019, 5:59 PM IST

ETV Bharat / bharat

सीएए कायदा मुस्लिमच नाही तर सर्व देशवासियांच्या चिंतेचा विषय - ओवेसी

नागरिकत्व सुधारणा कायदा फक्त मुस्लिमांसाठीच नाही, तर संपूर्ण देशावासियांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात सतत संघर्ष करावा लागेल असे, एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

असदुद्दीन ओवेसी
असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद - नागरिकत्व सुधारणा कायदा फक्त मुस्लिमांसाठीच नाही, तर संपूर्ण देशावासियांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात सतत संघर्ष करावा लागेल असे, एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

'मी रांगेत उभा राहून भारतीय आहे, हे का सिद्ध करू? मी या भूमीमध्ये जन्म घेतला आहे. मी भारताचा नागरिक आहे. नागरिकता प्रमाण पत्र घेण्यासाठी १०० कोटी लोकांना रांगेत उभे रहावे लागेल. त्यामुळे हा फक्त मुस्लिमांचा मुद्दा नाही, सर्व भारतीयांसाठी हा चिंतेचा विषय आहे. मोदी भक्तांनाही रांगेमध्ये उभं रहावे लागेल', असे मी त्यानाही सांगत असल्याचे ओवेसी म्हणाले.

असदुद्दीन ओवेसी यांचे भाषण

हेही वाचा -'अब दिल्ली दूर नही AQI २००'; मुंबईत मुलांचे आंदोलन लक्षवेधी

'भारतीय मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानात न जाता भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता. मी इच्छेने आणि जन्माने भारतीय आहे, तुम्हाला गोळी चालवायची असेल तर चालवा, तुमच्या गोळ्या संपतील. मात्र, भारतासाठीचे माझे प्रेम संपणार नाही. आमचा प्रयत्न भारताला संपवण्याचा नाही, तर भारताला वाचवण्याचा आहे, आमचे अभियान संविधानाला वाचवण्याचे आहे', असे ओवेसी म्हणाले.

हेही वाचा -शहरी नक्षलवादी सीएए व एनआरसीबाबत अफवा पसरवत आहेत, मोदींचा मोठा आरोप

यावेळी त्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली, आणि उपस्थित नागरिकांना म्हणायला लावली, त्याचबरोबर आंदोलनादरम्यान हिंसेमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details