डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सर्वानाच वेध लागतात, सरत्या वर्षांला निरोप देण्याचे आणि आगामी वर्षांच्या स्वागताचे. नव्या गोष्टींचा आरंभ करतानाही काही जुन्या घडामोडी कायम लक्षात राहतात. त्याचा आढावा वर्षाअखेर आवर्जून घेतला जातो. गेल्या वर्षभरात असंख्य घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये पुलवामाचा बदला घेणारा एअर स्ट्राईक, तिहेरी तलाक आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द , अशा महत्वाच्या घटनांचा समावेश आहे.
- अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल
कित्येक दशकांपासून न्यायालयात सुरू असलेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे.
- तिहेरीतलाक अखेर रद्द! तिहेरीतलाक अखेर रद्द!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अखेर राज्यसभेत तिहेरी तलाकबंदी विधेयक ९९ विरुद्ध ८४ मतांनी ३१ जुलैला संमत करून ऐतिहासिक विजय मिळवला. हा कायदा मोडणाऱ्या पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तिहेरी तलाक बंदी कायद्यानुसार पतीला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद. तर आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
- पुलवामाचा बदला घेणारा बालाकोट हल्ला - पुलवामाचा बदला घेणारा बालाकोट हल्ला -
जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने पुलवामाचा बदला म्हणून 26 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालकोट एअरस्ट्राईक करत दहशतवाद्याची तळे उद्धवस्त केली. यामुळं बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानला प्रतिउत्तर देताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. अभिनंदन दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. याप्रकरणी केंद्र सरकारनं कठोर भूमिका घेतल्यामुळे एक मार्च रोजी पाकिस्ताननं त्यांची सुटका केली. हा भारताच्या मुत्सद्दी धोरणांचा विजय मानण्यात आला.
- करतारपूर कॉरिडॉर करतारपूर कॉरिडॉर
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्तारपूर कॉरिडॉर प्रकल्प या वर्षी मार्गी लागला. पाकिस्तानात असलेलं शीखांचं पवित्र स्थळ गुरुनानक साहिब भारतातील बेर साहीब या गुरुद्वाराला कॉरिडॉरनं जोडण्यात आलंय. ९ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरदासपूर इथं भारताकडील बाजूचं उद्घाटन केलं. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जन्मदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला.
- देशात प्रलयंकारी पाऊस आणि पूरस्थिती देशात प्रलयंकारी पाऊस आणि पूरस्थिती