बंगळुरू- कर्नाटकमधील 15 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीचा निकालाची मतमोजणी आज पार पडली. या पोटनिवडणुकीतील निकालाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे भवितव्य निश्चित होणार होते. मात्र, भाजपने 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे.
कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : येडियुरप्पा सरकारचा धोका टळला, भाजपचा 12 जागांवर विजय - Karnataka live election update
भाजपला येथे सत्ता टिकवण्यासाठी १५ सीट पैकी सहा जागा जिंकण्याची गरज आहे. मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सध्या भाजपची घोडदौड सुरू आहे.
हेही वाचा-नागरिकत्व दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत, भाजपने जारी केला व्हीप
कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात, असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व आमदारांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. कर्नाटक पोटनिवडणुकीत अथणी, कागवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबल्लापूर, के.आर. पुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसाकोट, के.आर. पेटे, हुनसूर या जागांवर मतदार झाले होते. यातील 15 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर काॅंग्रेसला 2 जागांवरच विजय मिळवता आला आहे. एक जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.
- 2:30 PM - काॅंग्रेसचा केवळ 2 जागांवरच विजय
- 1:07 PM - काॅंग्रेसची एका जागेवर आघाडी कायम
- 1:06 PM -भाजपचा 12 जागांवर विजय
- 12:23 PM- काॅंग्रेस एक जागी आघाडीवर, तर एका जागी विजयी
- 12:22 PM- भाजपची 4 जागांवर आघाडी, तर 8 जागांवर विजय
- 11: 44 AM-भाजपची 7 जागांवर आघाडी, तर 5 जागेवर विजय
- 11: 43 AM-काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी जनादेश मान्य असल्याचे मत व्यक्त केले
- 11: 42 AM- कॉंग्रस 2 जागांवर आआडीवर
- 10:30 AM-भाजपचा एका जागेवर विजय
- भाजपला येथे सत्ता टिकवण्यासाठी १५ जागे पैकी ६ जागा जिंकण्याची गरज
- 10:00 AM-भाजप 10 जागांवर आघाडीवर
- चिक्काबल्लापूर आणि येसवंतपूरसह 10 जागांवर भाजप आघाडीवर
- कॉंग्रेस दोन जागांवर आघाडीवर
- जेडी (एस) एका जागेवर आघाडीवर
- अपक्ष उमेदवार शरथ बाचे गौडा जागेवर आघाडीवर