जयपूर- जालोर जिल्ह्याजवळ असलेल्या महेशपुरामध्ये बसला आग लाग लागून मोठी दुर्घटना झाली आहे. बसला वीजेचा तारांचा स्पर्श होऊन मोठी आग लागली. यावेळी लागलेल्या आगीत बसमधील 6 जणांचा मृत्यू झाला. तर २० से २५ जण जखमी झाली आहेत.
जैन यात्रेकरू असलेली बस रस्ता चुकून महेशपुरा गावात पोहोचली. या गावातून परत निघत असताना बसचा वीजेच्या तारांशी संपर्क आला. या बसला आग लागल्याची माहिती देताच स्थानिकांनी दिल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून प्रवाशांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर स्थानिक सरकारी अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.