कोलकाता -पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बस पलटी झाल्याने 15 कामगार जखमी झाले. शनिवारी उशिरा ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण बस मजुरांनी भरलेली असल्याची चर्चा परिसरात आहे.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये कामगारांची बस पलटली, 15 जखमी - migrants workers accident news
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बस पलटी झाल्याने 15 कामगार जखमी झाले. शनिवारी उशिरा ही घटना घडली.
migrants injured while travelling
धुपगुडी ब्लॉकमधील मोरंगा चौपाटीजवळ हा रस्ता अपघात झाला. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. साहूदंगी येथील वीट कारखान्यात काम करणारे सर्व स्थलांतरित कामगार पश्चिम बंगालमधील कूचबेहार जिल्ह्यात जात होते.
बसचालक नशेत असल्याने अपघात झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अपघातानंतर बस चालक फरार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये 30 जण होते