भोपाळ- मध्यप्रदेश राज्यातील बरवानी जिल्ह्यात कार आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे.
बरवानी जिल्ह्यातील निवाली तालुक्यात हा अपघात घडला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संसदेने बुधवारी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला कडक शिक्षेची आणि जास्त दंड आकारण्याची तरतूद केली आहे. तसेच 'हीट अॅन्ड रन' च्या गुन्ह्यात जास्त नुकसान भरपाई देण्याची तरतूद केली आहे.
यासह कायद्यात अपघात घडल्यानंतरचा पहिला तास म्हणजेच 'गोल्डन आवर' मध्ये जखमींवर कॅशसेल उपचार मिळण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आता अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ उपचार मिळणार आहेत.