भोपाळ- मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात ट्रक आणि बसच्या धडकेत ५ जण ठार झाले आहेत, तर ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री जिल्ह्यातील बरगी पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये हा अपघात झाला. रस्ता बनवण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हेही वाचा -सीएए कायदा मुस्लिमच नाही तर सर्व देशवासियांच्या चिंतेचा विषय - ओवेसी
बस कटनीवरून बालाघाटला जात असताना हा अपघात झाला. बसमध्ये एकून ५५ प्रवासी होते. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. खासगी गाड्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच १०८ नंबरवर फोन करुन आपत्कालीन मदत पथकालाही सूचना दिली.
हेही वाचा -शिमला फिरायला गेलेल्या युवकांची गाडी दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू
महामार्गावर रस्ता बनवण्याचे काम सुरू असल्याने फक्त एका बाजूने वाहतूक सूरू आहे. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस तपास करत असून सर्व जखमींना सरकार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.