उन्नाव- लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे वर भरधाव असलेली अनियंत्रित बस उलटली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस दिल्लीहून पाटण्याला जात होती. पोलिसांनी जखमींना बाहेर काढले असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे वर भरधाव बस उलटली; एक ठार, 35 जखमी - अनियंत्रित बस
लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वे वर भरधाव असलेली अनियंत्रित बस उलटली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस दिल्लीहून पाटण्याला जात होती.
भरधाव बस पलटली
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पाटण्याला जाणारी ही बस भरधाव असल्याने, चालकाचे यावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांपैकी 14 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती औरास पोलिसांनी दिली. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. जखमींवर औरास येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Last Updated : Oct 30, 2020, 1:16 PM IST