महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : मुंबईच्या माहिम कब्रस्तानमध्ये कोरोनामुळे दगावलेल्या समाजबांधवांच्या दफनविधीसाठी शुल्क नाही - मुस्लिम समुदाय अंत्यविधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांपैकी मुस्लिम समुदायातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी ठरवून दिलेल्या स्मशानभूमींपैकी एक माहिम कब्रस्तान आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण अंत्यविधी हा विनाशुल्क करता येणार असल्याची माहिती माहिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

COVID-19 : मुंबईच्या माहिम कब्रस्तानमध्ये कोरोनामुळे दगावलेल्या समाजबांधवांच्या दफनविधीसाठी शुल्क नाही
COVID-19 : मुंबईच्या माहिम कब्रस्तानमध्ये कोरोनामुळे दगावलेल्या समाजबांधवांच्या दफनविधीसाठी शुल्क नाही

By

Published : Apr 27, 2020, 10:29 AM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा विधीनुसार अंत्यविधीसाठी उपाय केले आहेत. यात मुस्लिम समुदायातील ज्या नागरिकांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला आहे, अशा नागरिकांचा अंतिमविधी माहिम कब्रस्तानमध्ये करण्याबाबतचे आदेश बृहन्मुंबई महापालिकेने दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांपैकी मुस्लिम समुदायातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी ठरवून दिलेल्या स्मशानभूमींपैकी एक माहिम कब्रस्तान आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण अंत्यविधी हा विनाशुल्क करता येणार असल्याची माहिती माहिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

माहिम मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष सुहैल खंडवानी याबाबत माहिती देताना म्हणाले, "अशा कठिण काळात माणुसकीचा भाव जपूण सहकार्य करणए हिच सर्वात मोठी सेवा आणि मानवता आहे. त्यानुसार आम्ही सर्व समुदायातील ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा बांधवांच्या दफनविधीचा खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, कोरोनाच्या संसर्गासाठीची जबाबदारी लक्षात घेत अंत्यविधीची सर्व क्रिया हि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येईल. संक्रमण होण्याचा धोका शून्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी प्रोटोकॉलनुसार अंत्यविधी केले जात आहेत.

अंत्यविधीकरता “खास शवपेट्याही तयार करण्यात आल्या असून अंत्यविधी आधी आणि नंतर परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details