महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर गोळीबार; हल्लेखोराला अटक! - हंसराज हंस दिल्ली गोळीबार

दंगेखोराने हंस यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार गोळीबार केला, आणि त्यानंतर तो पसार झाला होता. या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रामेश्वर पहिलवान असे या हल्लेखोराचे नाव आहे.

Rohini Hans Raj Hans attack

By

Published : Nov 4, 2019, 8:38 PM IST

Updated : Nov 4, 2019, 9:58 PM IST

नवी दिल्ली - रोहिणी शहरामध्ये राहणारे भाजप खासदार हंसराज हंस यांच्या कार्यालयाबाहेर आज गोळीबार करण्यात आला. हंसराज हे या कार्यालयात रोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असतात. ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी ते कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते.

दंगेखोरांने हंस यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार गोळीबार केला, आणि त्यानंतर ते पसार झाला होता. या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रामेश्वर पहिलवान असे या हल्लेखोराचे नाव आहे. ५१ वर्षांच्या रामेश्वरकडून वाहन आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२६ आणि कलम ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : धक्कादायक... महिला तहसीलदाराला कार्यालयातच जिवंत जाळले

Last Updated : Nov 4, 2019, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details