महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आज.. आत्ता.. रविवार सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - bjp

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि जनता दलामध्ये खदखद सुरू आहे. धुळ्यात महापुरूषांच्या विटंबनेवरून शहरात तणाव निर्माण झाला आहे. पुण्यातील सिनेमागृहातील समोश्यावर अन्न व औषध विभागाने बंदी घातली आहे. जालन्यात चारा छावणीसोबत जनावरांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंग्लडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलियातील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

आज.. आत्ता.. रविवार सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या

By

Published : Jun 9, 2019, 7:10 PM IST

तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना... बिहार वगळता इतर राज्यात जनता दल (यू)ची भाजपला सोडचिठ्ठी

पटना -गेल्या कित्येक दिवसांपासून खदखदत असलेला जनता दल (यू) आणि भाजपतील संघर्ष आज बाहेर आला आहे. अध्यक्ष नितिश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत आज जद(यू)ने भाजपप्रणीत एनडीए आघाडीतून बिहार वगळता इतर राज्यात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सविस्तर वाचा

धुळ्यात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना, शहरात तणाव.. पोलीस बंदोबस्त तैनात
धुळे -तालुक्यातील मोरदड तांडा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांची काही समाजकंटकांनी विटंबना केली. ही घटना लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. याठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. सविस्तर वाचा

पुण्यातील सिनेमागृहातील समोसे खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी
पुणे - नामांकित सिनेमागृहात समोसे पुरवणाऱ्या मे. एम. के. इंटरप्राइजेस या उत्पादकाला समोसे तयार करण्यावर व विक्री करण्यावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. हे समोसे तयार होत असलेल्या कारखान्यात नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खराळवाडी, पिंपरी येथील समोसा उत्पादक कारखाना मे.एम.के. इंटरप्राइजेस यांचा उत्पादन व विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश एफडीएने दिले. सविस्तर वाचा

चारा छावणीसोबतच जनावरांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे - उद्धव ठाकरे
जालना - चारा छावणीसोबतच जनावरांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. ती शिवसेना घेत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सविस्तर वाचा

IND VS AUS LIVE : भारताचा ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे तगडे आव्हान: शिखर धवनचे शतक
लंडन - विश्वकंरडकात लंडनच्या द ओव्हल मैदानावर आज खेळण्यात येत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे.भारताकडून शिखर धवनने शकत झळकवले आहे. सविस्तर वाचा

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details