महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' जिल्ह्यात म्हशींचं केलं जातं अपहरण; खंडणी दिल्यावरच मिळते परत म्हैस - म्हशी चोर

मध्यप्रदेशातील मुरैना येथे म्हशींचं अपहरण करुन खंडणी मागितली जाते. हा प्रकार येथील शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. या पद्धतीला स्थानिक भाषेत पनिहाई म्हणतात.

buffalo-kidnapping-in-mp
या जिल्ह्यात म्हशींचं केलं जातं अपहरण

By

Published : Dec 9, 2019, 5:16 AM IST

Updated : Dec 9, 2019, 7:36 AM IST

भोपाळ - तुम्ही माणसाचं अपहरण करुन खंडणी मागितल्याच्या घटना याआधी भरपूर ऐकल्या असतील. मात्र, जनावरांचं अपहरण केलं जात, असं क्वचितच ऐकलं असेल. मात्र, मध्यप्रदेशातील मुरैना येथे म्हशींचं सर्रास अपहरण केले जाते. म्हशींचं अपहरण करुन खंडणी मागितल्याच्या घटना मुरैना येथील शेतकऱ्यांना नवीन नाहीत. चंबळ नदीच्या खोऱ्यात लपून बसलेले भामटे मध्यस्थांमार्फत जनावरांची चोरी करतात.

या जिल्ह्यात म्हशींचं केलं जातं अपहरण

जनावरे चोरण्याच्या या पद्धतीला स्थानिक भाषेत 'पनिहाई' असे म्हणतात. गावातीलच काही स्थानिक किंवा भामटे लोक चोरांपर्यंत म्हशींची माहिती पोहचवतात. त्यानंतर भामटे रात्रीचं येवून म्हशींची चोरी करतात. त्यानंतर चोरटे मध्यस्थांमार्फत म्हशीच्या मालकाला खंडणी मागतात. ही खंडणीची रक्कम जनावराच्या किमतीच्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत असते. परिसरातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची जनावरे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

म्हशींची चोरी होत असल्याचे वृत्त खोटे असल्याचे मुरैना पोलिसांचे म्हणणे आहे. पनिहाई सारख्या घटना या भागात घडत नाहीत. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यावर पोलीस कारवाई करतील, असे पोलिसांनी सांगितले.

पनिहाई म्हणजे काय?

मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्येही म्हशी चोरीच्या घटना घडतात. स्थानिक नागरिक म्हशींच्या अपहरणामुळे चिंतेत आहेत. स्थानिक भाषेत यास 'पनिहाई' असे म्हणतात. पनिहाई म्हणजे मध्यस्थामार्फत चोरून नेलेले जनावर खंडणी दिल्यानंतर माघारी देणे. राजस्थानमधून आलेल्या भामट्यांमुळे म्हशी चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 9, 2019, 7:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details