नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून प्राप्तीकर मर्यादा जैसे थे ठवून करदात्यांची निराशा केली असून ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहोत अशा राज्यात योजनांची खैरात करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती.
अर्थमंत्री सीतारामन यांनी कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली. तसंच अजून दोन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासाठी काय -
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नसून टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
पहिल्यांदाच पेपरलेस बजेट -
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता. तसंच पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘मेक इन इंडिया’ टॅबचा वापर करण्यात आला. यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर करण्यात आला. दरवर्षी ज्या वही खात्यातून अर्थसंकल्प वाचला जातो, त्याऐवजी सीतारमण यांच्या हातात एक टॅब्लेट दिसून आले.
देशातील मेट्रोंसाठी तरतूद -
- - टिअर-२ आणि टिअर-१ शहरातील मेट्रो सुविधा स्वस्त करण्यावर भर. यासाठी मेट्रो निओ आणि मेट्रो लाईट अशा दोन सुविधा सुरू करणार.
- - नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद.
- - नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद.
- - कोची मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १,९५७ कोटी रुपयांची तरतूद.
- - चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६३,२४६ कोटींची तरतूद.
- - बंगळुरू मेट्रोच्या फेट २ए आणि २बी साठीअनुक्रमे ५८.१९ आणि १४,७८८ कोटी रुपयांची तरतूद.
अर्थसंकल्पात रेल्वेसाठी घोषणा -
- -रेल्वेसाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
- -२०२३ पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना अस्तित्वात येणार आहे.
- -डिसेंबर २०२३ अखेर रेल्वेचे ब्रॉडगेज पूर्ण करण्यात येणार
- -२०२३ पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना अस्तित्वात येणार आहे.
- -रेल्वे २०३० पर्यंत हायटेक करण्यात येणार आहे.
सीमा शुल्कात २.५ टक्क्यांची वाढ, मोबाईल आणि मोबाईलचे सुटे भाग महागणार
देशातील उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात मोबाईलच्या सुट्ट्या भागांवर २.५ टक्के सीमा शुल्क वाढविण्याची निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईलच्या किमती वाढणार आहेत.
केंद्रीय निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, मोबाईलचे सुट्टे भाग आणि चार्जवरील सीमा शुल्क वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील स्मार्टफोनच्या उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.
एक राष्ट्र, एक रेशन कार्ड -