महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थान सत्ता संघर्ष : बसपाच्या बंडखोर 6 आमदारांप्रकरणी उच्च न्यायालयाचा आज निकाल

सहा आमदारांना काँगेसमध्ये घेण्याच्या विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निर्णयाला भाजपा आणि बसपाने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सचिव आणि बंडखोर सहा आमदारांना 30 जुलैला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. मात्र, आमदार काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर त्यांना काम करण्यापासून रोखण्यात आले नाही. न्यायालयानेही तसा कोणताही निर्णय दिला नाही.

By

Published : Aug 6, 2020, 2:41 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जयपूर -राजस्थानात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात बहुजन समाजवादी पार्टीच्या (बसपा) 6 आमदारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या विरोधात भाजप नेते मदन दिलावर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (गुरुवारी) दुपारी राजस्थान उच्च न्यायालय निकाल देणार आहे.

काल (बुधवार) या प्रकरणी न्यायालयाने राजस्थान विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठविली आहे. बसपाच्या सहा आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यानंतर भाजपा नेते मदन दिलावर आणि बसपाचे राष्ट्रीय सचिव सतिश मिश्रा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. बसपाच्या सहा आमदारांना काँग्रेसचे आमदार म्हणून काम करण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र, न्यायालयाने यास नकार दिला होता. त्या विरोधात भाजपा आणि बसपा यांनी उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाकडे याचिका दाखल केली आहे.

सहा आमदारांना काँगेसमध्ये घेण्याच्या विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निर्णयाला भाजपा आणि बसपाने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सचिव आणि बंडखोर सहा आमदारांना 30 जुलैला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. मात्र, आमदार काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर त्यांना काम करण्यापासून रोखण्यात आले नाही. न्यायालयानेही तसा कोणताही निर्णय दिला नाही.

सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राजस्थानात सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपा काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. राजस्थान विधानसभेचे सत्र येत्या काही दिवसांत भरणार आहे. त्यावेळी बहुमत चाचणाी होण्याची शक्यता आहे. 3वेळा मागणी केल्यानंतर राज्यपालांनी 14 दिवस आधी नोटिशीनंतर सत्र घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, बसपा प्रमुख मायावती यांनी सहा आमदारांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचा इशारा राजस्थान काँग्रेसला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details