लखनऊ : राज्यसभा निवडणुकीत सपा-बसपा आमने सामने आहे. बसपाच्या सात आमदारांनी बंडखोरी केल्याने बसपा प्रमुख मायावतींनी त्यांची हकालपट्टी केली आहे. आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत मायावतींनी याबाबत माहिती दिली. सपाने बसपाचे सात आमदार फोडले. तसेच बसपाच्या दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे.
बसपाच्या सात आमदारांची हकालपट्टी - मायावतींची माहिती
बसपा आणि सपा लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. बसपाला 10 जागा मिळाल्या होत्या. मात्र राज्यसभा निवडणुकीत सपा-बसपा आमने सामने आहे. बसपाच्या सात आमदारांनी बंडखोरी केल्याने बसपा प्रमुख मायावतींनी त्यांची हकालपट्टी केली आहे.
मायावती
बसपा आणि सपा लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. बसपाला 10 जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत दोघांचेही सबंध बिघडले आहे असल्याची भावना मायावतींनी व्यक्त केली. तसेच गेस्ट हाऊस प्रकरणातील तक्रार मागे घेणे, ही माझी चूक असल्याचीही मायावती म्हणाल्या. राज्यसभा निवडणुकीत सपाच्या विरोधातील उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.