कठुआ(जम्मू काश्मीर)-बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)ने आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे. जम्मू काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यात बीएएसएफने ही कारवाई केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बीएसएफला पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात यश; कठुआ जिल्ह्यातील घटना - bsf shoots down pakistani drone
बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने कठुआ जिल्ह्यातील हिरानगर तालुक्यातील रठुआ या गावात पाकिस्तानी ड्रोन पाडले. आंतरराष्ट्रीय सीमेच्या भारताकडील भागात 250 मीटर आतील भूभागात आलेले ड्रोन पाडण्यात बीएसएफला यश आले.
![बीएसएफला पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात यश; कठुआ जिल्ह्यातील घटना bsf shoots pak drone](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:02:50:1592627570-img-20200620-wa0000-2006newsroom-1592624828-919.jpg)
बीएसएफने पाकचे ड्रोन पाडले
कठुआ जिल्ह्यातील हिरानगर तालुक्यातील रठुआ या गावात बीएसएफने ही कारवाई केली आहे. बीएसएफने शनिवारी पहाटे पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहे.
बीएसएफच्या जवानाना शनिवारी पहाटे 5.10 मिनिंटानी गस्त घालत असताना ड्रोन आढळला होता. आंतरराष्ट्रीय सीमेच्या भारताकडील बाजूस 250 मीटरवर भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देंवेंद्रसिंह यांनी 8 राऊंड फायर करत हे ड्रोन पाडले आहे.