- दिल्लीमध्ये लवकरच मिळणार मोफत वायफाय...
नवी दिल्ली -येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये लवकरच मोफत वायफाय सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 11 हजार हॉटस्पॉट लावण्यात येणार आहेत. आम आदमी पार्टीने २०१५ मधील विधानसभा निवडणुकीवेळी महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि मोफत वायफायची सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते.
- स्वामी नित्यानंदने वसवले स्वत:चे साम्राज्य...
नवी दिल्ली - सेक्स सीडीप्रकरणामध्ये अडकलेला वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंद हा 10 वर्षांपूर्वी देशामधून फरार झाला होता. त्यानंतर नित्यानंद पुन्हा चर्चेमध्ये आला आहे. स्वामी नित्यानंदने अमेरिकेतील इक्वोडोर देशाजवळ एक बेट खरेदी केले असून त्या बेटाला कैलास असे नाव दिले आहे.
- 25 हजारांचे बक्षीस असलेला आरोपी अटकेत...
गाझियाबाद - शहरातील सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी गोळ्या झाडल्यामुळे एक अपराधी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपीवर पोलिसांनी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
- हज यात्रा : अर्ज करण्याच्या तारखेत 25 दिवसांनी वाढ
नवी दिल्ली -हज यात्रा 2020 साठी अर्ज करण्याच्या तारखेत 25 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. हज यात्रेवर जायचे असल्यास 5 डिसेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. दिल्ली राज्य हज कमिटीने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्रही सुरू केले आहे.
- देशाच्या राजधानीमध्ये 8 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न