महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर... - ETV MARATHI NEWS

देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...

देशभरातील ठळक घडामोडी
देशभरातील ठळक घडामोडी

By

Published : Dec 3, 2019, 12:52 PM IST

Updated : Dec 3, 2019, 4:57 PM IST

एसपीजी दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली- एसपीजी म्हणजेच विशेष सुरक्षा दल दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. विधेयक मंजुरीवेळी काँग्रेस सदस्य सभागृहाच्या बाहेर निघून गेले.

कर्नाटक: प्लास्टीक मुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य घरोघरी वाटतायत कापडी पिशव्या

बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या प्लास्टीक मुक्त भारत अभियानांतर्गत प्लास्टीक मुक्त गाव करण्याचा विडा कर्नाटकातील श्रीराम नगर या गावाच्या ग्रामपंचायतीने उचललला आहे. या गावातील ग्रामपंचायत सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना कापडी पिशव्या वाटत आहेत. त्याचबरोबर प्लास्टीक वापराचे दुष्परीणामही गावकऱ्यांना समजावून सांगत आहेत. श्रीराम नगर हे गाव कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील आहे. वाटण्यात येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांवर स्वच्छ भारत अभियानाची माहिती लिहली आहे.

गुजरातमधील विद्यार्थ्याने बनवले चारचाकी वाहनात बसवण्यासाठी एअर प्युरिफायर मशीन

गांधीनगर - देशाला प्रदुषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी गुजरातमधील शालेय विद्यार्थ्याने चारचाकी गाडीत बसवता येईल असे 'एअर प्युरीफायर' बनवले आहे. अविनाश ओझा असे अभिनव यंत्र बनवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हे यंत्र गाडीच्या मागच्या बाजूला किंवा वरती बसवता येणार आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी करुन दाखवले.

तमिळनाडूमध्ये ट्रान्सजेंडर महिला बनली नर्स. राज्यातील पहिलीच घटना. राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या हस्ते सत्कार.

तिरुपती- शिर्डी रेल्वे आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात अपघातग्रस्त

आंध्रप्रदेश- तिरुपती - शिर्डी रेल्वे कडप्पा जिल्ह्यातील कोडूरु रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरली. इंजिनाच्या मागील बाजूला असलेला सामन्य प्रवासी डब्बा रुळावरुन घसरला. या घटनेत जिवीतहानी झाली नाही. दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले.

डिझेलने भरलेल्या रेल्वे डब्याला गळती, डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

बंगळुरू- मालवाहू रेल्वेच्या एका डब्यातून डिझेल गळती होत असल्याचे पाहुन स्थानिकांनी बादल्या, डबे घेवून रेल्वेकडे धाव घेतली. बंगळुरुला जाणारी रेल्वे हवेरी येथील यालवीगिरी स्थानकाजवळ थांबली असता ही घटना घडली. रेल्वे डब्यातील डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

ओडिशामध्ये महिलेवर सामुहीक अत्याचार, आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश

ओडिशा- ओडिशामध्ये महिलेवर सामुहीक अत्याचाराची घटना घडली आहे. ही घटना पुरी जिल्ह्यातील पोलीस वसाहतीमध्ये घडली. जिल्ह्यातील निमापोरा येथील बस स्थानकावर उभी असताना एका व्यक्तीने महिलेला लिफ्ट दिली.
पोलीस असल्याची सांगितल्यामुळे महिलेने विश्वास ठेवला. मात्र, कारमध्ये इतर तीन व्यक्ती होते. या सर्वांनी महिलेला पोलीस वसाहतीत नेले. त्यातील दोघांनी महिलेवर बलात्कार केला. कुंभारपाडा पोलीस स्थानकात महिलेने तक्रार दाखल केली आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना हलवले

श्रीनगर- जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला ५ ऑगस्टपासून पोलिसांच्या निगराणीत आहेत. त्यांना श्रीनगरमधून जम्मूमधील बथिंडी येथे हलवण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरला स्वायतत्ता देणारे ३७० कलम काढून टाकल्यानंतर तसेच राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यापासून ते पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. ५ ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच नागरीकांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादण्यात आली आहेत.

राजस्थान : नागहरगड बायोलॉजिकल पार्कमधील सिंहाला अर्धांगवायूचा झटका

जयपूर - राजस्थानमधील नागहरगढ बायोलॉजिकल पार्कमधील लायन सफारीचं आकर्षण असेलेला तेजस नावाचा सिंह आजारी पडला आहे. मागील काही दिवसांपासून तेजस सिंहाची प्रकृती खराब झाली आहे. त्याच्या शरीराचा मागील भाग अर्धांगवायूने लुळा पडला आहे.

याबरोबरच मागील काही महिन्यांपूर्वी या बायोलॉजिकल पार्कमधील ३ वन्य प्राण्यांचे प्राण गेले आहेत. यामध्ये गुजरातमधून आणलेल्या सुझेन या सिंहीणीचा मृत्यू झाला आहे. तर सीता नावाच्या पांढऱ्या वाघिणीसह वाघाच्या मादी बछड्याचाही मृत्यू झाला आहे.

घरगुती भांडणातून दिल्लीतील तिघांनी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन घेतली उडी

नवी दिल्ली- दिल्लीमधील इंदिरापुरम भागातील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन तीन व्यक्तींनी उडी मारल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजणाची प्रकृती गंभीर आहे. पत्नी पत्नीने भांडणानंतर आपल्या २ मुलांची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या प्रकरणाशी संबधित इतर एका महिलेनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. घरगुती कारणांवरुन ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.

हैदराबाद बलात्कार खून प्रकरणातील तरुणीला न्याय देण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचे उपोषणाला

नवी दिल्ली - हैदराबाद महिला डॉक्टर बलात्कार खून प्रकरणी देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल उपोषणाला बसल्या आहेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींनी सहा महिन्याच्या आत फाशीची शिक्षा होईल, असा नियम केंद्र सरकार जोपर्यंत बनवत नाही, तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Last Updated : Dec 3, 2019, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details