लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यामुळे, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या १,२०० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीचे पालन न केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर आहे.
देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. मात्र, ही संचारबंदी धुडकावून हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर आले होते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. शांततेत सुरू झालेले हे आंदोलन, काही काळानंतर हिंसक झाले होते.