लुधियाना- पंजाबमधील लुधियाना येथे लहान मुले रेल्वे रुळांवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. कॅनॉलवरती बांधण्यात आलेल्या रुळांवरुन रेल्वे जाताना मुले पाण्यात उडी मारतात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO : कॅनॉलवर बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलावर मुलांचे धोकादायक स्टंट - पोलीस
कॅनॉलवर बांधण्यात आलेल्या अरुंद रेल्वे पुलावर मुले उभी राहतात. यादरम्यान, वेगात असलेली रेल्वे जवळ येताच मुले पाण्यात उडी मारतात.
कॅनॉलवर बांधण्यात आलेल्या अरुंद रेल्वे पुलावर मुले उभी राहतात. यादरम्यान, वेगात असलेली रेल्वे जवळ येताच मुले पाण्यात उडी मारतात. कॅनॉलमध्ये उड्या मारणारी मुले यावर बोलताना म्हणाली, आम्हाला उडी मारताना कोणतीही भीती वाटत नाही. आम्ही लहान असल्यापासून आम्ही कॅनॉलवर येत आहोत. मागील १० ते १५ वर्षांपासून आम्ही कॅनॉलमध्ये उडी मारतो. यावेळी कोण पाण्यात बुडत असेल तर आम्ही त्याला वाचवतो. कोणाला पोहता येत नसेल तर, आम्ही त्याला उडी मारू देत नाही.
पोलीस अधिकारी रजनदीप सिंग म्हणाले, कॅनॉलमध्ये उड्या मारणाऱ्या मुलांना पकडण्यासाठी आम्ही पथके पाठवली आहेत. कॅनॉलमध्ये उड्या मारणे धोकादायक आहे. हे आम्ही त्यांना सांगितले आहे. परंतु, पोलिसांची पथके पोहचताच मुले पळून जाण्यात यशस्वी होत आहेत.