'राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा भारताचा अंतर्गत विषय' - National Register of Citizens
बांग्लादेशातील सीमा रक्षक महानिदेशक मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांनी एनआरसी हा मुद्दा पूर्णपणे भारत सरकारचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले.
राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा भारताचा अंतर्गत विषय
नवी दिल्ली - नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) वरून देशभरात वातावरण पेटलेले पहायला मिळत आहे. बांग्लादेशातील सीमा रक्षक महानिदेशक मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांनी एनआरसी हा मुद्दा पूर्णपणे भारत सरकारचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले. भारत सीमा सुरक्षा दल आणि बांग्लदेश सीमा रक्षक महानिदेशक यांच्यादरम्यान 49 वी द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी सीमेवर परस्पर समन्वय सुधारण्याचा निर्णय घेतला आहे.