विदिशा (भोपाळ, मध्यप्रदेश) -लॉकडाउनचा परिणाम आर्थिक आणि सामाजिक घटकांसह धार्मिक कार्यावरही झाला आहे. लॉकडाउनमुळे कुटुंबीय मृत नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थींना विसर्जित करू शकत नाहीत. यामुळे स्मशानभूमीत असलेल्या लॉकर्समध्येही अस्थी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत.
गजंबासौदा (विदिशा) येथील स्मशानभूमीत अस्थींना ठेवण्यासाठी लॉाकरची सुविधा आहे. पण, अस्थी विसर्जित करता न आल्याने लॉकरमध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी अस्थीकलश झाडावर टांगले आहेत. तर काहींनी जमिनीमध्ये गाडून ठेवले आहेत. ज्यावेळी लॉकडाउन संपेल त्यावेळी अस्थीविसर्जित करणार असल्याचे काहींनी सांगितले.
जवळ जी नदी आहे त्या नदीत करा अस्थि विसर्जन - धर्मगुरु