हैदराबाद - आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही नाव कमावलेल्या इरफान खान यांचे आज निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर इरफानने कर्करोगावरही मात केली होती. लंडनमध्ये उपचार झाल्यानंतर इरफान सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात परतला होता.
त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधूनही इरफान खान यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोनाली कुलकर्णी
इरफान खान यांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुख: झाले असून धक्का बसला आहे. एका प्रतिभेचा अंत झाला आहे.
सुजित सरकार
माझ्या प्रिय मित्रा, तु लढला, लढला आणि लढला. मला तुझा कायम अभिमान राहील. आपण पुन्हा भेटू.
महेश बाबू