महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बॉईज लॉकर रुम : संभाषणाचे स्क्रीनशॉट ट्विट केल्यामुळे मुलीला धमक्या - Cyber Cell of the Delhi Police

बॉईज लॉकर रुम गृपच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट टि्वट करणाऱया मुलीच्या तक्रारीवरून सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर संबधित मुलीला धमक्या येत असल्याचे तीने म्हटलं आहे.

बॉईज लॉकर रुम
बॉईज लॉकर रुम

By

Published : Jun 8, 2020, 4:18 PM IST

नवी दिल्ली - बॉईज लॉकर रुम गृपच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट टि्वट करणाऱया मुलीच्या तक्रारीवरून सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर धमकीचे संदेश येत असल्याचे तीने म्हटलं आहे. अश्लील संदेश आणि अल्पवयीन मुलींचे फोटो या गृपमध्ये शेअर केले जात होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

चॅटचे स्क्रीनशॉट ट्विट केल्यामुळे मुलीला धमक्या, अपमानजनक आणि आक्षेपार्ह संदेश येत होते. त्यावर संबधित मुलीने तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांकडून ही तक्रार सायबर सेलकडे हस्तांतरीत करण्यात आली. आयटी कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान इन्स्टाग्राम ग्रुपच्या अ‍ॅडमिनला अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

दिल्लीतील काही शाळकरी मुलांनी एकत्र येऊन सोशल मीडिया अ‌ॅप इन्स्टाग्रामवर 'बॉईज लॉकर रुम' नावाने एक अकाऊंट तयार केले होते. या ग्रुप चॅटमध्ये ही मुले इन्स्टाग्रामवरील इतर मुलींचे फोटो शेअर करत, आणि त्यांच्यावर असभ्य टिप्पणी करत. कहर म्हणजे, या मुलींवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार कसा करता येईल याबाबतही ही मुले चर्चा करत. या चॅटरुममधील संभाषणांचे स्क्रीनशॉट्स लीक झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला होता. या लॉकर रुममध्ये झालेला सामूहिक बलात्काराबाबतचा संवाद ज्या व्यक्तीने केला, तो मुलगा नसून मुलगीच असल्याचे समोर आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details