फ्लोरिडा - येथील जैक्सनविले नेवल एयर स्टेशनवर बोईंग ७३७ विमान रनवेवरुन घसरुन सेंट जॉन नदीमध्ये कोसळले. विमानात १३६ प्रवासी होते. यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात घडला.
फ्लोरिडा : रन वे वरुन घसरुन बोईंग विमान थेट नदीत कोसळले..
अपघात झालेले विमान क्यूबा येथून जैक्सनविले येथे पोहोचले होते. जैक्सनविले येथील महापौरांनी ट्विट करुन विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती दिली.
अपघात झालेले विमान क्यूबा येथून जैक्सनविले येथे पोहोचले होते. जैक्सनविले येथे लँडींग होत असताना ही घटना घडली. जैक्सनविले येथील महापौरांनी ट्विट करुन विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती दिली.
तेथील स्थानिक वेळेनुसार हा अपघात काल रात्री ९.४० वाजता घडला. अपघातानंतर नौदनाचे सुरक्षा रक्षक, स्थानिक शीघ्र कृतीदलाचे कर्मचारी मदत केली. २१ जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या २१ जणांची प्रकृती स्थिर आहे. या विमानात प्रवाशांसह क्रू मेंबर्सही होते. नदीत पाण्याची पातळी कमी असल्याने मोठा अपघात टळला.