हैदराबाद - कुशाईगुडा परिसरात ७८ वर्षीय वृद्धाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज उघडकीला आली. या वृद्धाचा एका लाच प्रकरणात समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृत वृद्धाला नुकताच जामीन मिळाला होता आणि तेव्हापासून तो अस्वस्थ होता. त्याने विवंचनेत आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.