लखनौ - उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात शरयू नदीमध्ये बोट उलटल्याची घटना घडली आहे. बोटीतील १९ जण बेपत्ता असल्याची माहिती हाती येत आहे. एक मृतदेह हाती आला असून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.
बोटीमध्ये एकून २० ते २५ जण असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य हाती घेतले आहे. उमरीबेगमगंज पोलीस क्षेत्रातील ऐली परसौली गावाजवळ ही घटना घडली.
उत्तर प्रदेशातील शरयू नदीत बोट उलटली; १९ जण बेपत्ता, एक मृतदेह हाती - नाव उलटली
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात शरयू नदीमध्ये बोट उलटल्याची घटना घडली आहे. बोटीतील १९ जण बेपत्ता असल्याची माहिती हाती येत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
बातमीमध्ये वापरलेले छायाचित्र प्रतिकात्मक आहे.