पाटणा - सारण जिल्ह्यातील छपरामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बोटींची टक्कर झाली. यामुळे एक बोट बुडून दुर्घटना झाली असून बोटीवरील कामगार बेपत्ता आहेत. रिविलगंजच्या माझी पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
बिहारच्या छपरामध्ये वाळू वाहतूक करणारी बोट बुडाली - छपरा बोट न्यूज
बिहारच्या छपरामध्ये माझी पुलाजवळ दोन बोटींची टक्कर झाली. या दुर्घटनेत वाळू वाहतूक करणारी एक बोट बुडाली असून त्यावरील कर्मचारी बेपत्ता आहेत. सध्या पानबुडे आणि एनडीआरएफचे पथक मदतकार्य करत आहे.
छपरा बोट दुर्घटना
दोन्ही बोटी नदी पात्रातून वाळू भरून निघाल्या होत्या मात्र, अचानक एका बोटीची दुसऱ्या बोटीला टक्कर बसली. ज्या बोटीमध्ये जास्त वाळू भरलेली होती तिचे नियंत्रण सुटल्याने ती पाण्यात बुडाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच जवळपासच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या पानबुडे आणि एनडीआरएफचे पथक मदतकार्य करत आहे. बोटीवरील सर्व लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.