बंगळुरू - कर्नाटकच्या राजधानीमधील दोन हॉटेलांचे विलगीकरण कक्षांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यासोबतच आणखी १४ हॉटेलांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. शहर नागरी संस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १६३ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील विलगीकरण कक्षांची आणि कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. यासंदर्भात आम्ही आतापर्यंत १६ हॉटेलांना सूचना दिल्या असून, त्यामधील दोन हॉटेलांचे विलगीकरण कक्षांमध्ये रुपांतर करण्यात आले असल्याची माहिती बंगळुरू महापालिका प्रशासनाने दिली आहे.