महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ स्फोट, ८ जवान जखमी - security personnel

पूँछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथे ही घटना घडली आहे. स्फोटात गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकातील आठ जवान जखमी झाले. जखमींना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रतिकात्मक

By

Published : May 22, 2019, 3:40 PM IST

जम्मू- काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ स्फोट घडून आला. या स्फोटात आठ जवान जखमी झाले. पूँछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथे ही घटना घडली आहे. यानंतर हा आयईडी बॉम्बचा स्फोट असल्याची चर्चा होती. मात्र, याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने माहिती देताना आयईडी स्फओट नसल्याचे सांगितले आहे.

'हा आयईडी स्फोट नव्हता. प्रशिक्षणाशी संबंधित कारवाई सुरू असताना ही घटना घडली. तसेच, कोणतीही गंभीर स्थिती नाही. मात्र, एक जवान गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर ७ जण किरकोळ जखमी असून तेही उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे,' असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. स्फोटात गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकातील आठ जवान जखमी झाले. जखमींना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, याआधी या घटनेविषयी 'काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ आयईडीद्वारे स्फोट झाला. स्फोटात आठ जवान जखमी झाले. यात एका जवानाला वीरमरण आले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सात जवान जखमी असून ते उपचार घेत आहेत,' अशी माहिती समोर आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details