महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, १९ ठार तर २० जखमी

पंजाबच्या बाटला गावातील रहिवासी भागात हा कारखाना आहे. दिवाळी जवळ आल्यामध्ये कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके बनवण्याचे काम सुरू होते. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची दोन पथके दाखल झाली. यासोबतच जिल्ह्यातील उच्च अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

By

Published : Sep 4, 2019, 7:47 PM IST

Updated : Sep 4, 2019, 8:30 PM IST

Blast in a firecracker factory in Batala

चंदीगढ - पंजाबच्या बाटला मधील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे आग लागून १९ लोक ठार, तर २० लोक जखमी झाले आहेत. तसेच अजूनही बरेच लोक अडकून आहेत. सायंकाळी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, १९ ठार तर २० जखमी

गुरुदासपूरच्या बाटला गावातील रहिवासी भागात हा कारखाना आहे. दिवाळी जवळ आल्यामध्ये कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके बनवण्याचे काम सुरू होते. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची दोन पथके दाखल झाली. यासोबतच जिल्ह्यातील उच्च अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट असून, तपास आणि बचावकार्य सुरु आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, तसेच गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी ट्विट करत आपले दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा : मोटार वाहन कायद्याचा झटका, रिक्षाचालकाला तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड

Last Updated : Sep 4, 2019, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details