नवी दिल्ली - महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या एक पाऊल मागे आल्या आहेत. पक्षाची भूमिका ही माझी भूमिका असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले.
आधी गोडसेंना म्हटले देशभक्त, नंतर माघार घेत साध्वी म्हणाल्या पक्षाची भूमिका ती माझी भूमिका - pragya thakur
भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला होता. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पक्ष याबाबतचे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
भाजप हे माझे संघटन असून या संघटनेप्रती माझी निष्ठा आहे. भाजपची मी कार्यकर्ता आहे. पक्षाचा शब्द हा माझा शब्द आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन एक पाऊल मागे घेतले आहे.
भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन होता. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पक्ष याबाबतचे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जाहीर माफी मागायला हवी, असेही पक्षाकडून प्रज्ञासिंह ठाकूर यांना सांगण्यात आले होते.