नवी दिल्ली -हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासंर्दभात आज भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीनंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
हरियाणा-महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूकासंर्दभात आज भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे .पी नड्डा ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, दोन्ही राज्यांचे प्रभारी आणि राज्यांचे अध्यक्ष बैठकीत उपस्थित आहेत.
महाराष्ट्र आणि हरियाणा मधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने नुकतीच केली आहे. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणा येथे मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आणि माघार घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर यंदाची ही पहिली राज्य निवडणूक आहे. हरियाणा विधानसभेची मुदत 2 नोव्हेंबरला आणि महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे.