नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केली आहे, असा टोला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
संसदेचे सध्या सुरू असलेले सत्र ११ फेब्रुवारीला संपणार आहे. असे असताना, ही राम मंदिर ट्रस्टबाबतची घोषणा ८ फेब्रुवारीनंतरही करता आली असती. मात्र, पंतप्रधानांनी आजच ही घोषणा केली. कदाचित भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकांची काळजी लागून राहिली असेल, त्यामुळे त्यांनी ही घोषणा करण्याची घाई केली असावी, असे मत ओवैसींनी व्यक्त केले.