कोलकाता - पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील २४ परगणा जिल्ह्यातील भाटपाडा येथे रविवारी रात्री चंदन साव या भाजप कार्यकर्त्याती गोळी घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या, सुरक्षा व्यवस्था तैनात - tmc
ही घटना रविवारी रात्री घडली. बैरकपूर लोकसभा जागेसाठी मतदानाच्या आधीपासूनच या परिसरात हिंसेच्या घटनांची वाढ झाली होती. हे घटनासत्र अद्याप थांबलेले नाही.
चंदन साव
ही घटना रविवारी रात्री घडली. बैरकपूर लोकसभा जागेसाठी मतदानाच्या आधीपासूनच या परिसरात हिंसेच्या घटनांची वाढ झाली होती. हे घटनासत्र अद्याप थांबलेले नाही. या हत्येनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच, या हत्येला टीएमसी (तृणमूल काँग्रेस) जबाबदार असल्याचे म्हटले आहे.