कोलकाता - भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह कालव्यात तरंगताना आढळून आला आहे. पश्चिम बंगाल मधील हुगळी येथे ही घटना घडली आहे. हुगळी येथील पोलिसांनी ही माहिती दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांची ओळख पटली असून काशीनाथ घोष असे त्याचे नाव आहे.
भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप - WB
भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह कालव्यात तरंगताना आढळून आला आहे.
भारतीय जनता पक्ष
भाजपने काशीनाथ यांची हत्या केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसवर केला आहे. काशीनाथ यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या लालचंद बाघ या कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पुढील तपास सुरू आहे.