चेन्नई -तामिळनाडूमधील त्रिची जिल्ह्यातील येराकुडी येथील भाजप कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले. तसेच त्याठिकाणी तो दररोज मोदींची पूजा करतो आणि दुधाने अभिषेक देखील करतो.
तामिळनाडूमध्ये भाजप कार्यकर्त्याने बांधले पंतप्रधान मोदींचे मंदिर, दररोज करतो पूजा - तामिळनाडू पंतप्रधान मोदी मंदिर
तामिळनाडूमधील एक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्याने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले आहे. तसेच मोदी हे एक चांगले व्यक्ती असून त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी मी हे मंदिर बांधले असल्याचे त्या कार्यकर्त्याने सांगितले.
शंकर (वय५०), असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. तो शेतकरी देखील आहे. तसेच तो येराकुडी शेतकरी संघटनेचा नेता आहे. तो लहानपणापासूनच पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. त्यामुळे त्याने स्वतःच्या शेतात मोदींचे मंदिर बांधले. तो दररोज मोदींच्या पुतळ्यासमोर दिव्यांची आरास देखील करतो.
मोदी हे एक चांगले व्यक्ती आहे. तसेच त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे मला त्यांचे मंदिर बांधण्याची इच्छा होती. मात्र, मला माझ्या शेतीमधून पाहिजे तसे पैसे मिळत नव्हते. तरीही मी थोडे-थोडे पैसे वाचवले. त्यामधूनच गेल्या ८ महिन्यांपूर्वी मंदिर बांधायला सुरुवात केली. आता त्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे, असे शंकरने सांगितले.