नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ जागा जिंकल्यानंतर पुढीलवर्षी होणारी विधानसभा निवडणूकही भाजपच जिंकेल, असा विश्वास भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी भाजपच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि दिल्ली भाजप प्रमुख मनोज तिवारी यांची उपस्थिती होती.
दिल्लीत पुढीलवर्षी भाजपचीच सत्ता येणार - जे पी नड्डा - मनोज तिवारी
जे पी नड्डा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपने १३ हजार बुथांपैकी १२ हजार बुथांवरती विजय मिळवला आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे.
जे पी नड्डा म्हणाले, दिल्ली भाजप अखंडरित्या काम करत आहे. पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ६०० गावे दत्तक घेतली आहेत. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात जाऊन झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने १३ हजार बुथांपैकी १२ हजार बुथांवरती विजय मिळवला आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे. कार्यकर्त्यांनी प्रथम पक्षाचा विचार करावा. दिल्ली जिंकण्यासाठी सर्वांनी स्थानिक पातळीवर जाऊन काम केले पाहिजे.
भाजप सरकारच्या योजनांचे कौतुक करताना नड्डा म्हणाले, १८ हजार गावात वीजेची जोडणी नसताना उज्वला योजना अंतर्गत ८ कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळाली. हा न्यू इंडिया आहे. भारतातील प्रत्येकजण मोदींना सहकार्य करत आहे. प्रत्येकजण शेतकऱ्यांबद्दल बोलत असतो. परंतु, भाजपने पंतप्रधान किसान सन्मान योजना लागू केली. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. दिल्लीतील १६ लाखांपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा फायदा होत आहे.